राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरू असून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं असल्याची माहिती समोर आली आहे..आज संध्याकाळपर्यंत दिल्लीत मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे
उद्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या महायुतीच्या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा 2-2-1 असा फॉर्मुला निश्चित झाला असल्याची माहिती समोर आली आहे… दरम्यान, भाजपा नेते व फडणवीसांचे सहकारी आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे..ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित होण्याचा आम्हाला निश्चितच अतिशय आनंद होत आहे. माझ्यासह तमाम भाजपा कार्यकर्त्यांना त्यामुळे आनंद होईल. महाराष्ट्रातील तमाम जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्यामागे आपलं बहुमत दिलं आहे..असं त्यांनी सांगितलं..
दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत, असं वाटतं? असा प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना विचारलं विचारण्यात आला. तेव्हा आमच्यासाठी कोण समाधानकारक आहे? आमच्या वाट्याला कधीही संकटच आलेले आहेत. 70-75 वर्षात आमच्या वाट्याला संघर्ष आला आहे, कोणीही आला काय त्याचे आम्हाला सुख किंवा दुःख असण्याचे काही कारण नाही. आमच्या जीवनात संघर्ष आहे आणि तो आम्हाला करावाच लागणार आहे, असं जरांगे म्हणालेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आज संध्याकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.