राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून होतं.. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजपा उमेदवार राम शिंदे यांचा पराभव केला आहे.. हा पराभव त्यांच्या चांगला जिव्हारी लागला असून आज त्यांनी पत्रकार परिषद घेत कर्ज जमकर मध्ये मी कटाचा बळी ठरलोय.. सुनियोजित कटाने मी राजकीय सारीपटात मागे पडलो असा आरोप त्यांनी केला..
दरम्यान आज प्रीती संगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट झाली.. यावेळी या भेटीत अजित पवार यांनी रोहित पवारांना चांगलाच टोला लगावला. यावरून राम शिंदे यांनी अजित पवारांवर चांगलीच टीका केली आहे.. ते म्हणाले , अजित पवार यांनी येथे धर्म पाला नाही मी नियोजित कटाचा बळी ठरलो.. पवार कुटुंबियांमधील छुप्या करार केल्याने माझा पराभव झाला असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.
या विधानसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात सर्वात कमी मतांनी पराभव झालेल्या उमेदवारांच्या यादीत माझा नंबर लागतो.. याविषयी बोलण्याची माझी मानसिकता नव्हती मात्र जर अजितदादा या संदर्भात बोलले असतील तर मला बोलल्याशिवाय पर्याय नाही असं त्यांनी सांगितलं.. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून झालेला राम शिंदे यांचा पराभव त्यांच्या चांगला जिव्हारी लागला.