राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकालात महायुतीला बहुमत मिळालं आणि महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला.. हा पराभव महाविकास आघाडीच्या चांगला जिव्हारी लागल्यानंतर आता उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत.. आज उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray)शिवसेना युबीटी पक्षांच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना युबीटी पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आलीय. त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना (Aditya thackeray)मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
आजच्या बैठकीत पक्षाकडून ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना एक मोठी संधी दिली आहे..आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाच्या विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची वर्णी लागली आहे. तसेच सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या प्रतोदपती नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात महायुतीला २३० जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले.तर महाविकास आघाडीला मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महाविकास आघाडीचा झालेला दारुण पराभव यानंतर आघाडीचे सर्वच नेते ॲक्शन मोडवर आले आहेत..