राजमुद्रा : महाराष्ट्रातील सर्वात मोठा मंडप व सर्वात मोठी जागा असलेल्या शिरपूर नगरीत शिवमहापुराण उत्सव समितीतर्फे 1 ते 7 डिसेंबर दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून कथा आयोजित करण्यात आली आहे.. मांडळ शिवारातील करवंद रोडवरील भगवान महावीर उद्यान येथे सुमारे 60 एकर पेक्षा अधिक क्षेत्रात शिव महापुराण कथा होणार आहे.. सुमारे 10 ते 12 लाख भाविक रोज करत असताना येणार असून त्यांची सोय व्हावी म्हणून शिरपूर नगरी सज्ज झाली आहे..
शिवमहापुराण कथेसाठी शिरपूर नगरीत वीस पेक्षा जास्त स्क्रीन मंडपात लावण्यात येणार असून स्वयंपाकासाठी 15 एकर जागा वेगळी करण्यात आली आहे..पंडित मिश्रा यांच्यासह मधून वाणीतून शिवमहापुराण कथा आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीची हेमंत पाटील,प्रसाद पाटील, रोहित शेटे, विशाल अग्रवाल, निलेश अग्रवाल, सचिन जैन, भालचंद्र वाघ,नीलिमा ठाकूर यांनी दिली.. भाविकांना मुक्कामासाठी जवळच मंडप टाकून राहण्याची खाण्याची सोय करण्यात आल्याचे आयोजकांनी कळवलं आहे. तसेच कथा स्थळापासून दोन किलोमीटर अंतरात पार्किंग उपलब्ध असणार आहे. तसेच दहा हजार स्वयंसेवकांनी सेवा देण्यासाठी नोंदणी केली आहे. दरम्यान या कथेसाठी 22 ऑक्टोबर रोजी सिहोराला तारीख ठरली तारीख ठरताचं फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.
या शिव महापुराण कथेसाठी समितीतर्फे राहुल फुलारी, संजय शर्मा, राधेश्याम जागीर यांनी तयार केलेल्या तीन लाख रुद्राक्ष पासून महादेवाचे शिवलिंग करून सोबत 31 फुटी त्रिशूल कथेत ठेवण्यात येणार आहे..सिद्ध रुद्राक्षाचे 8 डिसेंबरला वाटप होणार असून 24 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता 31 हजार रुद्राक्षापासून बनवलेल्या शिवलिंगावर रुद्राभिषेक व महाप्रसाद करण्यात येणार आहे. तसेच शिव महापुराण ग्रंथाची कलश यात्रा 29 ला सकाळी साडेनऊ वाजता पाटील वाडा येथून निघणार असून कुंभार टेक मार्गे शहादा रोडने कथा स्थळी आणून त्याची स्थापना स्टेजवर करण्यात येणार आहे.. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी पंडित प्रदीप मिश्रा यांचं आगमन होणार असून त्यांची शोभायात्रा किसान विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यालयापासून ते पाटील वाड्यापर्यंत काढण्यात येणार आहे. कथेचे आयोजक हेमंत पाटील, माजी नगरसेवक मोहन पाटील यांनी प्रामुख्याने केला असून सर्व शिरपूरकर आयोजक असल्याची भावना अग्रसेन भुवनात झालेल्या बैठकीत व्यक्त केली उस्तव समितीत प्रमुख प्रसाद पाटील, एडवोकेट सुहास वैद्य, अनिल अग्रवाल, अमित जैन,शरद अग्रवाल, रोहित शेटटे,नितीन धाकड,अशोक शर्मा, अमोल पाटील, शुभम पाटील यांच्यासह सदस्यांचा समावेश आहे..
दरम्यान या शिव महापुराण कथेच्या नियोजनासाठी शिरसाट व सर्व इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर यांची साथ लाभत आहे. तसेच विकी चौधरी गणेश चौधरी, टिलू पाटील, अंकित शेवाळे,राहुल राजपूत,भुरा पाटील राधे चौधरी हे महत्त्वाच्या समित्या सांभाळत आहेत. तसेच तुलसीबाई यांची सर्व जमीन लेवल करण्याचे काम सुरू केले आहे.. या शिव महापुराण कथेसाठी शिरपूर नगरी सज्ज