राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला अधिक बहुमत मिळालं. या निकालानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिल आहे ते नव्या सरकारच्या शपथविधीकडे.. यासाठी आमदारांची धाकधूक वाढली असून कोणाला मंत्रिपद मिळणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. आता महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आला असून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तर मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यात भाजपचे १० आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
महायुती सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार आहे.. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनुभवी चेहरे मंत्रिमंडळात असणार आहेत..भाजपकडून आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा या नेत्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.तर शिवसेनेकडून दीपक केसरकर, शंभूराज देसाई, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत यांनी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
. अजित पवार गटाकडूनही काही नेत्यांवर महत्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दिलीप वळसे -पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. तर शिंदे सरकारमध्ये अदिती तटकरे या एकमेव महिला मंत्री होत्या. त्यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण खातं होतं. त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळतं का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.