राजमुद्रा : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आला असून मुख्यमंत्री पदाबाबतची उत्सुकता ही राजकीय वर्तुळात शिगेला पोचली आहे.. आता नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागलं असताना नुकतच भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शपथविधी तारीख ठरल्याची सांगत संपूर्ण प्लॅन सांगितला आहे.येत्या ३० तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले..तसेच महायुतीत एकनाथ शिंदे हे नाराज नसून चर्चा पसरवल्या जात आहेत..तसेच मुख्यमंत्रिपदाचा आणि मंत्रिपदाचे फॉर्म्युला एकत्रित बसून ठरवला जाईल, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नवीन सरकार कधी शपथ घेणार, मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी माहिती समोर आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, यात भाजपचे १० आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे. त्यामुळे आता नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे..