राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला अधिक बहुमत मिळालं आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला.. या महायुतीच्या विजयानंतर युतीच्या नेत्यांकडून आघाडीच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप तर जोरदार टीका करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवरच आता विधान परिषदेवर आमदार असलेले गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे..शरद पवारांनी आता सेवानिवृत्ती घेण्याची गरज आहे.. गेल्या लोकसभेत युतीला हरवल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं परंतु, आता विधानसभेत तुम्हाला जागा दाखवली आहे. त्यामुळे शरद पवार नावाचा अध्याय आता राजकारणातून संपला अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
विधान परिषदेवर आमदार असलेले गोपीचंद पडळकर आता सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांमधील राजकीय वैर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून भाजपाने लहान राज्यात पराभव स्वीकारला तर मोठी राज्ये स्वतःकडे ठेवली, अशी टीका शरद पवारांनी केली होती.. या टिकेला आता पडळकर यांनी जोरदार पलटवार दिला आहे.. शरद पवारांनी आता स्वच्छने सेवानिवृत्ती घ्यावी.. शरद पवार हा कोलांड्या उड्या मारणारा माणूस आहे असा हल्लाबोल ही त्यांनी चढवला आहे..
दरम्यान याआधी आणि मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या आंदोलनामुळे दोन्ही नेत्यांमधील वादाने टोक गाठले. दरम्यान, आता जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
गोपीचंद पडळकराना काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांचं आव्हान होतं. हे आव्हान गोपीचंद पडळकर यांनी मोडून काढलं आणि ३८ हजार मतांच्या फरकाने ते विजयी झाले. गोपिचंद पडळकर यांना १ लाख १३ हजार ७३७ मते मिळाली तर, विक्रमसिंह सावंत यांना ७५ हजार ४९७ मते मिळाली आहेत.