राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपला असताना नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिल आहे.. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाकडून मुख्यमंत्रीपदावर दावा केला जात येत आहे.. या दाव्यानंतर आता मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांना भाजपकडून दोन ऑफर दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना राज्याचा उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रात मंत्री पदाची ऑफर भाजपकडून देण्यात आली आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने 132 जागा जिंकल्यामुळे भाजप मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहे.. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच असावेत अशी भाजपच्या नेत्यांचीं आणि कार्यकर्त्यांचीं इच्छा आहे.. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिली आहे.. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर दावा करणारे एकनाथ शिंदे नाराज झाले असून भाजपने दिलेल्या त्या दोन ऑफरवरही ते नाराज आहेत.दरम्यान दिल्लीतून देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
या मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाला अधिक पसंती असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक लढवली गेली आहे. लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याला पसंती दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं, अशी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकार सत्तेत येण्यासाठी मोठी मदत झाली. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही योजना आल्याचा शिंदे गटाचा दावा आहे.
या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं.. तर महाविकास आघाडीला मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.. त्यामुळे महायुतीचं सरकार नवीन सरकार बनवण्यासाठी चांगलं ॲक्शन मोडवर आला आहे.