राजमुद्रा : नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिल असताना मुख्यमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरु आहे. भाजपला अधिक मत असल्यान भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे केले जात आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे केले जात आहे.. या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि महायुतीतील मित्रपक्ष प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी भाजपला सुनावला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळेच मागे भाजप पक्ष सत्तेत आला.. त्यांनी बंड केलं नसतं तर लाडकी बहीण योजना भेटली नसती.. एकनाथ शिंदे यांच्या मुळेच ही योजना भेटली म्हणून भाजपचे लाडके भाऊ सत्तेत आहे.. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दुर्लक्षित करता येणार नाही असं त्यांनी म्हटले आहे.
राज्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत मात्र भाजपचा त्याला विरोध आहे. अशातच आता प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी भाजपला तुम्ही एकनाथ शिंदेंमुळेच सत्तेत आला आहात, याची आठवण करून दिली आहे. या नव्या सरकारच्या शपथविधी कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.. या विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करत आहे.. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.. राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत अजून ठोस निर्णय झाला नसून आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यताच नसल्याच्यां चर्चा आहेत..यावरून भाजपा दिलेला शब्द कधीही पाळत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.. आता या महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा वाद मिटणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे