राजमुद्रा : राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा जोरदार सुरू असताना दिल्लीतून मोठी माहिती समोर आली आहे..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे..शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच, नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम 2 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 237 जागांवर विजय मिळाला असून भाजप 132, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला 41 जागा जिंकता आल्या आहेत. संख्याबळ पाहता भाजपला अधिक मत मिळाला असून भाजप कार्यकर्त्यांकडून आणि समर्थकांकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी जोर लावत आहे.. त्यातच, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती देत मुख्यमंत्रीपदासाठी आपला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्या चर्चाना उधाण आलं आहे.मात्र , एकनाथ शिंदेंची नाराजी जास्त काळ राहिल असं दिसत नाही.आता एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलावली असून दोन दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, शिंदेंनी पत्रकार परिषद बोलावल्याने ते आपली नाराजी किंवा मुख्यमंत्रीपदाबाबत काय भूमिका मांडतील हे पाहावे लागणार आहे.
राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरुन राजकीय वातावरण तापलं असताना दिल्लीतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिली आहे.
दरम्यान सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.