राजमुद्रा : विधानसभा निवडणूक निकाल नंतर महायुतीत मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केल्या असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.. या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली आहे.. मुख्यमंत्री पदाबाबतच्या निर्णयाला माझा संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले आहे.. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा संस्पेन्स लवकरच संपणार आहे.त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचा स्पष्ट झाला आहे..
एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.. या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, भाजप निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.. मोदींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे भाजपच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले..मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला.. लावली त्यांनी जनतेचे आभार मानले.. हा विजय सर्वात मोठा आहे…अडीच वर्षात महायुतीने जी काही काम केले त्यावर लोकांनी विश्वास ठेवला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली..
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले मी स्वतःला मुख्यमंत्री म्हणून कधी समजलं नाही कॉमन मॅन म्हणून काम केलं.. सर्वसामान्यांसाठी काही केलं पाहिजे असं मला वाटायचं.. मी देखील शेतकरी सामान्य कुटुंबातून आलोय त्याच्या वेदना व्यथा मी पाहिले आहेत असेही ते म्हणाले..दरम्यान एनडीए आणि महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपला अंतिम असेल तसा आम्हालाही अंतिम असेल निर्णय घेताना माझी अडचण आहे का असं वाटून देऊ नका.. तुम्ही घेतलेला निर्णय मला मान्य असेल असे स्पष्ट एकनाथ शिंदे यांनी सांगितले..
‘भाजपला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. आमची बैठक होणार आहे. भाजपची बैठक होणार आहे. त्यात ते निर्णय घेतील असे एकनाथ शिंदे म्हणाले.. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाला आहे.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला अधिक मत मिळालं.. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे..