राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला अधिक बहुमत मिळालं आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला.. हा पराभव महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जीवाला लागला असून नुकताच ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. नुकतीच नाशिक मध्ये शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
महाविकास आघाडीतील पराभवानंतर नाशिकमध्ये बिघाडी झाली आहे..आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. ठाकरे गटाची महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादीवर नाराजी आहे. आघाडीतील घटक पक्षांनी ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित तसं सहकार्य झालं नाही, असा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप आहे. ठाकरे गट स्वतंत्रपणे लढल्याने शंभर टक्के यश येईल अशी शिवसैनिकांना खात्री असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी म्हटलं आहे महानगर प्रमुखांची माहिती आहेत. त्यामुळे आता नाशिकमध्ये ठाकरे गट स्वबळावर विजयी होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने तब्बल 230 पेक्षा जास्त जागा जिंकत महाविकास आघाडीला धोबीपछाड केलं.. या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि पराभूत उमेदवार त्यांच्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडत आहेत.. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी पराभवाचे मंथन करत आहे.. आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे..