शेंदुर्णी राजमुद्रा वृत्तसेवा | शेंदुर्णी येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १५७ रुग्णांनी सहभाग घेतला. २९ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी दिनांक ९ जुलै रोजी गोदावरी हॉस्पिटल येथे घेऊन जाणार आहेत. युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शहर प्रमुख संजय सूर्यवंशी, भैया गुजर, अजय भोई, सुनील अग्रवाल उपस्थित होते. तसेच गणेश पांढरे, निळकंठ पाटील, विलास बारी, बारकू जाधव, अशोक बारी, राजू पाटील, विजय पाटील, मुकेश जाधव, रवींद्र पवार, गणेश कोळी, राहुल ढमाळे, मिथुन चव्हाण, प्रशांत चौधरी, हेमंत पाटील आदी उपस्थित होते.