राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने लागून सहा दिवस उलटले तरीही मुख्यमंत्री पदाचा पेच अद्यापही सुटला नव्हता.. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?याकडे राज्याचे लक्ष लागला असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री केले जाईल हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत गुरुवारी रात्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या बैठकीत अमित शाह यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी खातेवाटपासह मुख्यमंत्रिपदावर चर्चा केली. दीड तास झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलाय.
विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला यानंतर आता मुख्यमंत्री भाजपचा असणार असल्याचे स्पष्ट झाला आहे.. दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना दोन डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.. येणाऱ्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सह काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान नव्या सरकारमध्ये 4 महिलांची मंत्रिपदी वर्णी लागणारआहे . मंत्रिपदासाठी महिलांचे प्रोफाईल मागवण्यात आले असून यात पंकजा मुंडे, माधुरी मिसाळांच्या नावाची चर्चा आहे. आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेगळा असून नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरु झालीय. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि बीकेसी मैदानाची चाचपनी सुरु असल्याची माहिती मिळते. वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्क, आणि आझाद मैदान उपलब्ध नसल्याने इतर पर्यायांचा विचार सुरू असल्याची माहिती आहे.