राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून काही दिवस उरले तरीही महाराष्ट्राला नव मुख्यमंत्री अजून मिळाला नाही.. नवस सरकार कधी स्थापन होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं असताना कालच दिल्लीत झालेल्या बैठकीतून नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.. तसेच मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाला आहे..काल दिल्लीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली.या बैठकीत नव्या लोकांनाही मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याची चर्चा आहे.. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळेल हे देखील उस्तुकतेच ठरणार आहे.
महाराष्ट्राचे विद्यमान कार्यवाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. यानंतर आता महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याचे स्पष्ट झालं असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना आधीच पाठिंबा दिला आहे. त्यानंतर नवीन मंत्रिमंडळात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील अशी चर्चा सुरु आहे. पण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नाहीत अशीही चर्चा आहे.
दरम्यान या दिल्लीत झालेल्या बैठकीबद्दल शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी वक्तव्य केला आहे.. ते म्हणाले दिल्लीत सकारात्मक चर्चा झाली असली तरी एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणात राहतील असं वाटतं मात्र ते कदाचित उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत असा माझा अंदाज आहे..
दुसरीकडे नवीन सरकार स्थापनेला वेळ लागत असल्याने विरोधकांनी महायुतीवर टीका करायला सुरुवात केली आहे. बहुमत असून पण सराकार का स्थापन होत नाही असा सवाल महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केला आहे.