राजमुद्रा : राज्यात सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.. विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.. त्यानंतर राज्याचे काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून ते कार्यभार पाहत आहेत. ते नाराज असल्याच्यां चर्चा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी नवीन मागणी केली आहे. ते गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. गृहमंत्रिपद मिळालं तरच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार असल्याची माहिती समोर आली आहे..अन्यथा उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेना शिंदे गटातील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, मात्र अजूनही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात यालेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्यास म्हटले जात आहे.. तरी इतर मंत्रीपदी कोणा कोणाच्या नावाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.समोर आलेल्या माहितीनुसार येत्या पाच 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. मात्र त्यापूर्वी महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे.
दुसरीकडे भाजप देखील गृहखात्यासाठी अग्रही आहे, भाजप देखील गृहखातं सोडण्यास तयार नाही, त्यामुळे अशा स्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना गृहखातं मिळणार का? नाही मिळाल्यास उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेच्या कोणत्या वरिष्ठ नेत्याला मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 132 जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे 57 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे राज्यात आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं मानलं जात आहे.