राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना मुख्यमंत्रीपदाची चर्चा आता चांगलीच रंगली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा नाव निश्चित केलं गेला असल्याची माहिती समोर आली असताना मुख्यमंत्री पदासाठी आता नवीन नाव चर्चेत आहेत. अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार यापुढे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे.. मुख्यमंत्री हा भाजपचा होणार असल्याचे बोलत असताना भाजप नेतृत्वाचा इतिहास पाहता महाराष्ट्र राज्यात देखील नवीन चेहरा जाहीर केला जाणार की फडणवीस यांना संधी मिळणार हे पहावं लागणार आहे.. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.. या चर्चेवर बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिला आहे ते म्हणाले, समाज माध्यमातून माझ्या नावाच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा ही निरर्थक आहे असं त्यांनी स्पष्ट केला आहे..
भाजपा तू राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ हे सध्या पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.पहिल्याच प्रयत्नात खासदारकी पटकवणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली.. मात्र अचानक आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचं नाव आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने अधिक मत मिळवून भाजी मारली असताना मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा अशी मागणी धरत आहेत.. यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव दिल्लीतील बैठकीत निश्चित झाल्या असल्यासही मानले जात आहे.. आता मुख्यमंत्रीपदी ते केव्हा विराजमान होणार पाहणे महत्वाचे ठरणार आहे.