जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | कोरोना काळात वाढते व्यसनांचे प्रमाण, बेरोजगारी यामुळे कुटुंबात कलह वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर वी केअर हॉस्पिटल तर्फे कुटुंब कौन्सिलिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ जुलै रोजी सकाळी ११ ते ५ या कालावधीत संबंधितांना समुपदेशन केले जाणार आहे. तरी गरजू कुटुंबियांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रागिब शेख व डॉ. भुषण पाटील यांनी केले आहे.
या शिबिरासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. ज्यांना या शिबिरात भाग घ्यायचा असेल त्यांनी वी केअर हॉस्पिटल, भास्कर मार्केट शेजारी येथे संपर्क साधावा. असे आवाहन रागिब अहमद कौन्सिलर यांनी केले आहे. याठिकाणी महिला कौन्सिलर देखील उपस्थित राहणार आहेत. तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.