राजमुद्रा : शिरपूर येथे होणाऱ्या परमपूज्य राष्ट्रीय संत श्री पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेसाठी राज्यभरातील शिवभक्त शिरपूर मध्ये दाखल होत आहेत.. लाखोंचा जनसमुदाय या शिवपुराण कथेसाठी जमणार आहे. आता या कथेसाठी जाणाऱ्या असंख्य भाविकांसाठी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सोनगीर टोल नाक्याचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री कृष्णा राव यांना पत्र देऊन व स्वतः त्यांच्याशी बोलून सोनगीर टोल नाका व शिरपूर टोल नाका फ्री केला आहे..
शिरपूर येथे होणाऱ्या शिव महापुराण कथाचां कार्यक्रम एक डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.. या शिव महापुराण कथेचा असंख्य हिंदू बांधव लाभ घेणार आहेत व संपूर्ण जिल्ह्यातून अनेक भाविक आपापल्या वाहनातून उपस्थित राहणार आहेत.. आपल्या भाविकांसाठी धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी मोठे पाऊल उचलत सोनगिरी टोलनाक्याच्या शिष्ट मंडळाला सहकार्याची सूचना करत वाहनांना टोल माफी करून शिवभक्तांना या शिव महापुराण कथेचा अधिक लाभ मिळवून दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात नुकताच धुळे शहरात अनुप भय्या अग्रवाल यांना दणदणीत विजय मिळाला. या विजयानंतर त्यांनी शिरपूर महापुराण कथेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोठं पाऊल उचलून एक प्रकारे भाविकांना मोठा दिलासा दिला आहे.