राजमुद्रा : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साताऱ्यातील दरे या गावी गेल्यानंतर तब्येत बिघडली. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी काल विश्रांती घेतली.. या विश्रांतीनंतर आज ते मुंबईत परतणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेच्याच्या हालचालींना चांगला वेग आला असताना संध्याकाळी महायुतीची बैठक ही होणार आहे.. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली.. त्यानंतर आज एकनाथ शिंदे ठाण्याला परतणार आहेत. एकनाथ शिंदे दुपारी दरेगावातून हेलिकॉप्टरने रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाल्यानंतर ते विविध बैठकीत सहभागी होणार की नाही आणि महायुतीकडून पुढे कोणती पावलं उचलली जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी येत होते. परंतु आजारी असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांची भेट नाकारली. मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे.एकनाथ शिंदे यांनी माघारीचा दावा केला असला तरी ते गृहमंत्री पदावर अडून बसले असल्याचे ही चर्चा होत आहे.. त्यामुळे ते आज होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुत्याला स्पष्ट बहुमत मिळाला असताना सत्ता स्थापनेची गाडी अजूनही पुढे सरकली नाही.. आता येत्या पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..