राजमुद्रा : दिल्ली दरबारी झालेल्या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या मूळ गावी गेले. गावी गेल्यानंतर त्यांची अचानक तब्येत बिघडली.. त्यामुळे काळजीपोटी त्यांची भेट घेण्यासाठी अनेक जण दरे या गावी पोहोचले.. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांना भेट न घेताच परतावे लागले आहे.. तब्येत ठीक नसल्याने एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.. त्यांच्या गावी भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांना ही प्रवेश नाकारण्यात आला.. तसेच जळगाव पाचोडचे आमदार कपिल पाटील भेटीसाठी पोहोचले होते मात्र त्यांनाही भेट नाकारण्यात आली. तर निकटवर्तीय संजय मोरे यांच्याकडून भेटीसाठी आलेल्या आमदारांनी कार्यकर्त्याकडून संपर्क केला जात आहे.. अशातच आता शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांचीही भेट नाकारल्याने त्यांना गेटवरूनच परत जावे लागले.. त्यामुळे शिंदे गटात काय घडतंय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान आता भेट नाकारल्यानंतर दीपक केसरकर यांनी देवाचा धावा केला आहे.. ते सकाळी वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना आता मंत्रीपदासाठी वर्णी लागावी म्हणून अनेकजाण इच्छुक आहेत.. दरम्यान मंत्रीपदी आपली वर्णी लागावी यासाठी अनेक नेत्यांनी आतापासून फिल्डिंग लावली आहे.