राजमुद्रा : राज्यात सत्ता स्थापनेला वेग आला असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस आपल्या साताऱ्यातील दरे गावाला गेल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.. काळजी वाहू मुख्यमंत्री गायब होणे कितपत योग्य? असा सवाल उपस्थित करत प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला कोणती शेती असते असा टोला त्यांनी लगावला.
राज्यात सत्ता स्थापनेला होत असलेला विलंब अन अशातच काळजी व मुख्यमंत्र्यांचे गायब होणे यावरून आदित्य ठाकरे यांनी वेगळ्या शंकाही उपस्थित केल्या . आहेत. आदित्य ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या दरे गावात जाण्याबाबत सवाल करण्यात आला. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमावस्या आणि पौर्णिमेला अशी कोणती शेती असते असा सवाल करत जोरदार टोला लगावला.. तसेच
आदित्य ठाकरे यांनी आकाशाकडे पाहून ‘तुम्हाला चंद्र दिसतो का?’ असा खोचक सवालही केला. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसतेय.
दरेगावातील निवासस्थानी मुख्यमंत्री विश्रांती घेत असून भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांना ही प्रवेश नाकारला जात आहे.. त्यांची तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्लाही दिला आहे.. आता विश्रांतीनंतर आज ते पुन्हा मुंबईत परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. त्यानंतर महायुतीची बैठक होणार असून या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत .