राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या चंद्रकांत पाटील यांचा दणदणीत विजय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या आघाडीच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा दारुण पराभव झाला. हा पराभव त्यांना चांगलाचजिव्हारी लागला असून त्यांनी केलेल्या धक्कादायक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.. त्या म्हणाल्या विधानसभेच्या निकाला आधीच माझे प्रतिस्पर्धी उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी समाज माध्यमावर मतप्रदर्शन व्यक्त केलं होतं.. मात्र निकाल जाहीर होण्याआधीच एखाद्या उमेदवाराला आपल्याला किती मते मिळणार हे कसं समजू शकतो असा गंभीर प्रश्न उपस्थित करत यादीतील आकडे आणि निकाल लागल्यानंतर विशिष्ट मतदान केंद्रावर झालेले मतदान तंतोतंत कसे जुळलं असा प्रश्न उपस्थित केला आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीनं बहुमत मिळून महाविकास आघाडीला धोबीपछाड केलं.. या निकालानंतर महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्यासह विविध नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला जात आहे.. यामध्ये प्रामुख्याने वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएम मशीनची विश्वासार्हता उपस्थित केली असून अनेकांनी संशय व्यक्त करत आंदोलनाची तयारी देखील सुरू केली आहे तर दुसरीकडे मतदारसंघातून फेर मतमोजणी करण्याची ही मागणी केली आहे.
या मुक्ताईनगर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या रोहिणी खडसे या उमेदवार होत्या आणि त्यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील उमेदवार होते.. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर सत्तेचा दुरुपयोग झालं जी चर्चा सर्वत्र होत असतानाच खडसे यांनी केलेल्या विधानाने एक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यामुळे विधानसभा निवडणूक आणि निवडणूक आयोग दोघांचीही विश्वासाहर्ता पुन्हा एकदा पणाला लागण्याची चिन्ह आहेत.
अशातच मुक्ताईनगर मतदारसंघातील उमेदवार रोहिणी खडसे यांनी केलेल्या धक्कादाय दावा अनेक प्रश्न निर्माण करतो त्यामुळे हा आता चर्चेचा विषय ठरला आहे..