राजमुद्रा : नव्या सरकारचा शपथविधी तोंडावर असताना महायुतीमध्ये खाते वाटपावरून धुसफूस सुरू आहे.. या नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी प्रत्येकाने जोरदार लॅबिन्ग लावली आहे. अशातच आता खानदेशातील शिंदे गटाची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवारांना चांगलंच डिवाचलं आहे. महायुतीत अजितदादा आले नसते तर 100 जागा आम्ही जिंकल्या असतात असा टोला त्यांनी लगावला.
ते म्हणाले, भाजपने अजित दादांना सोबत घेतलं तेव्हा नाराजीचा सूर पसरला.. आमच्या नेत्यांनी तुम्ही सोबत का घेतलं त्यांना असे विचारले.. या विधानसभा निवडणुकीत आम्ही केवळ ८५ जागा लढलो. कदाचित अजितदादा मध्ये आले नसते, तर त्या जागा आमच्या वाट्याला आल्या असत्या, तर आज तुम्हाला शिवसेनेच्या ९० ते १०० जागा दिसल्या असत्या.. जे तुम्हाला अडीच वर्षांत जमलं नाही ते आमच्या शिंदे साहेबांनी करुन दाखवलं, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीच्यां अजित पवार यांना डिवाचलं.
यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले ,’एकनाथ शिंदे लाडक्या बहिणांचे लाडके भाऊ झाले. शेतकऱ्यांचे लाडके भाऊ झाले. तरुणांचा मित्र झाले. मायबहिणींचे आशीर्वाद घेऊन हा माणूस लढतोय. शिंदे साहेबांवर टीका करणं योग्य नाही, असं पाटील म्हणाले. आता त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादांनी ही मेहनत घेतली आहे..’महायुती म्हणून एकत्र लढलो आहोत तर आता तिघांनी एकत्र राहिलं पाहिजे. शिंदे साहेबांची मेहनतही आहे. आम्ही नाकारत नाही. फडणवीसांची मेहनतदेखील आम्ही नाकारत नाही,’ असं मिटकरी म्हणाले.