राजमुद्रा : राज्यात येत्या पाच तारखेला आझाद मैदानावर संध्याकाळी पाच वाजता या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.. या शपथविधीची जय्यत तयारी सुरू असून मुख्यमंत्र्यांसह किमान 20 जणांचा शपथविधी होणार आहे.. आता या शपथविधीसाठी महाविकास आघाडीतील दिग्दज नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.. या नेत्यांमध्ये आघाडीतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, यांच्यासह विजय वडेट्टीवर, पक्षनेते अंबादास दानवे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वंचितचे प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांना ही निमंत्रण देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवसांनी अखेर नवे सरकार कधी स्थापन होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोचली होती.. राज्यातील महायुतीचे सरकार येत्या ५ डिसेंबर रोजी शपथ घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने बहुमत मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड केलं.. या निवडणुकीत महायुतीला २८८ पैकी महायुतीला २३५ जागा मिळाल्या आहेत. भाजपने सर्वाधिक १३२ जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर बाजी मारली होती.
आता या महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी लवकरच पार पडला असून या शपथविधी सोहळ्याला आघाडीतील नेतेही उपस्थिती लावणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..