राजमुद्रा : नव्या सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होणार असला तरी मंत्रिमंडळातील खातेवाटपावर अजून चर्चा झाली नाही. अशातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनीं जोर धरला आहे.. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी संशय व्यक्त करत केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या रुसव्या फुव्या पाठीमागे दिल्लीतील महाशक्तीचा हात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे..
दिल्लीतील एका महाशक्तीच्या पाठिंब्याशिवाय एकनाथ शिंदे यांचे धाडस होऊ शकत नाही असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.. दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व बैठका रद्द होत असल्याने चर्चा पुढे सरकत नसल्याचं म्हटलं जातंय. मात्र, यावरून संजय राऊतांना वेगळाच संशय आला आहे. दिल्लीतील महाशक्ती एकनाथ शिंदेंच्या पाठिशी असल्याने एकनाथ शिंदे भाजपाला डोळे वटारून रुसवे फुगवे करू शकत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला बहुमत मिळाले आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला.. हा पराभव आघाडीच्या चांगला जिव्हारी लागला.. आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीवर आरोप प्रत्यारोप संशय व्यक्त केले जात आहेत.. या दरम्यान ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणाले, तीन वर्षांपूर्वी ईडी, सीबीआय, दिल्लीतील गृहमंत्रालयाला घाबरून शिवसेना फोडून पळून गेले. त्यांना तीन वर्षांत असं कोणतं टॉनिक मिळालं की ते दिल्लीला डोळे दाखवून रुसवे फुगवे करून बसलेत. दिल्लीतील महाशक्ती महाराष्ट्रात हा खेळ करतंय आणि हा भाजपातील अंतर्गत खेळ आहे असा हल्लाबोल संजय राऊत यांनी चढवला.