राजमुद्रा : नव्या सरकारचा शपथविधी तोंडावर आला असताना गृहखात्यावरून शिंदे आणि भाजपमध्ये अजून तिढा कायम आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृह खात्यावर अडून बसले आहेत तर दुसरीकडे भाजपही ग्रह खातं सोडण्यास तयार नाही.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार हे जवळपास निश्चित झाला आहे.. तरी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात स्वतःकडेच ठेवले त्यामुळे भाजप ही ठाम राहिला आहे.. त्यामुळे आता ह्या गृह खात्याचा तिढा सुटणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
गृहखात्यावरून आग्रही असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला सुधीर मुनगंटीवार यांनी थेट उत्तर दिलंय. मागणी आणि हट्ट यात फरक असून तर्काच्या आधारे गृहखात्याचं वाटप होईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे . गृहखात्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे आग्रही असून जर गृहखातं मिळालं तर ते स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती आहे. अमित शाहांसोबत दिल्लीत बैठक झाल्यानंतरही अद्याप गृहखात्यांवर तोडगा निघालेला नाही.. त्यामुळे गृहमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे..
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने मुंबईत होणारी महायुतीची बैठक रद्द झाली. पण चर्चेतून मार्ग निघेल असे एकनाथ शिंदे म्हणालेत. मुख्यमंत्र्यानंतर दुसऱ्या नंबरचं खातं हे गृहखातं समजलं जातं. फडणवीसांनी गृहखातं स्वतःकडे ठेवल्यास अर्थखातं अजित पवार यांच्याकडे गेल्याने अजित पवार नंबर दोनचे नेते होणार आहे. त्यामुळे शिवसेना गृहखात्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. आता या गृहमंत्री पदावरून महायुतीत नाराजी असल्यास बोलले जात आहे.. या नव्या सरकारच्या शपथविधीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असताना या पदाचा तिढा कधी सुटेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..