राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेची ठरलेली ती जामनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोडपे यांच्या विरोधात महायुतीचे गिरीश महाजन रिंगणात होते. या मतदारसंघात महाजन यांचा विजय झाला तर खोडपे यांचा पराभव झाला.. या पराभवानंतर त्यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे.. जामनेरच्या जनतेच्या मनातला उमेदवार मीच आहे..अन्य उमेदवाराला जनतेने मतदान केलेलं नाही..यंदाच्या निवडणूक निकालामध्ये ईव्हीएम यंत्र आणि अन्य माध्यमातून भाजपने गडबड केल्याचा आरोप त्यांनी लगावला आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
नुकतीच जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली.. या बैठकीत पराभूत उमेदवार आणि निवडणूक निकालाचा आढावा घेत आपली मते कुठे गेली असतील याचाही आढावा घेतला.. यावी पराभूत झालेले उमेदवार दिलीप खोडपे यांनी असेही म्हटले की, जामनेर मतदारसंघातील विजयी उमेदवार मीच असून मीच खऱ्या अर्थाने निवडून आलो अशी स्थिती आहे.. मात्र या निवडणुकीत यंत्र आणि शासकीय यंत्रणेत काहीतरी काळबेर झाला आहे.. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी गडबड करून ही निवडणूक जिंकली असा सणसणीत आरोप त्यांनी केला.
आगामी काळात नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील.. त्या अनुषंगाने तयारीला लागलं पाहिजे.. एका निवडणुकीत पराभव झाल्याने सर्व काही संपलं असं म्हणणार मी कार्यकर्ताच नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान या मतदारसंघात निवडणुकीत दिलीप खोडपे यांच्या विरोधात गिरीश महाजन यांची रंगतदार लढत झाली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची लाट पाहायला मिळाली.. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील 11 ही मतदारसंघात महायुतीने विजय मिळवत महाविकास आघाडीचा पराभव केला.. या जामनेर विधानसभा मतदारसंघात ही महायुतीची सरशी ठरली..