राजमुद्रा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महायुतीचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा आज पार पडला.. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही निमंत्रीत करण्यात आले होते. मात्र निमंत्रण देऊनही महाविकास आघाडीच्या नेत्यांची अनुपस्थितीती दिसून आली.दरम्यान या सोहळ्यालापंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्रि अमित शाह यांच्यासह भाजप सरकार असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.
या शपथविधी सोहळ्यासाठी महाविकास आघाडीचे देखील सर्वच नेते उपस्थित नव्हते.दरम्यान या आधी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांना देखील या शपथ विधिसाठी फोन केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दिल्लीत सुरू असलेल्या अधिवेशनामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नागपूरला असल्याने यांना देखील ते शपथविधीला उपस्थित राहू शकत नसल्याची माहिती आहे.
दरम्यान महायुतीच्या नव्या सरकारचा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा आज महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई येथील आझाद मैदानावर पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली..यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, यांच्यासह जेष्ठ नेते उपस्थित होते..
दरम्यान शपथविधी समारंभासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. तसेच राज ठाकरे यांना देखील शपथविधीचे आमंत्रण होते. मात्र, ठाकरे कुटुंबातील कोणीही शपथविधीसाठी उपस्थिती राहिले नाही. राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.