राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला.. यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यां दोघांनी शपथ घेतली… दरम्यान उद्यापासून तीन दिवसीय विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे.. त्यापूर्वी प्रक्रियेचा भाग म्हणून आज भाजपाचे आमदार कालिदास कोळबंकर यांची महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आज राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कालिदास कोळंबकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या निलम गोऱ्हे उपस्थितीत होत्या. येत्या 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी तीन दिवस मुंबईत विशेष अधिवेशन होणार आहे. या विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येते. ही शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड करणं गरजेचे असते. त्यानुसार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता राहूल नॉर्वेकर यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार का? की भाजप नवनिर्वाचित आमदाराला संधी देणार? हे पाहणं तितकाच महत्त्वाचा असणार आहे..
दरम्यान भाजपाचे कालिदास कोळबंकर हे 15 व्या विधानसभेतील सर्वात अनुभवी आमदार आहेत.. त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.. 1990 पासून सातत्याने विधानसभा निवडणुका जिंकल्या. प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवण्याच्या पराक्रमाची कालिदास कोळबंकर यांच्या नावावर नोंद आहे.