राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आणि महाविकास आघाडीला पराभवला सामोर जावं लागलं. या निवडणुकीतील पराभव आघाडीच्या नेत्यांच्या चांगला जिव्हारी लागला.. या निवडणुकीत ईव्हीएम वर संशय व्यक्त केला जात असून यामुळे आता सोलापुरातील मालकवाडीत वातावरण चांगलं तापलं आहे. गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. मात्र गावकऱ्यांना बॅलेट पेपरवर मतदान घेण्यापासून रोखण्यात आलं. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे मारकडवाडीत पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेणार असाल तर मी राजीनामा देण्यास तयार असल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे..
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं. त्यानंतर महाविकास आघाडीकडून (MVA) ईव्हीएमवर आक्षेप घेत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. अशातच सोलापूरमधील माळशिरसमधील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याला प्रशासनाकडून विरोध करण्यात आला. या घटनेनंतर आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार तेथे पोहोचले आहेत..त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला यावे त्यांनी त्यांना नवा पर्याय सुचवला आहे.. ते म्हणाले याबाबत तालुक्याच्या सर्व ठराव करा आम्हाला ईव्हीएम वर मतदान नको.. जुन्या पद्धतीने मतदान करायचा आहे,, ठरावाची प्रत उत्तम जानकरांकडे द्या.. आमच्याकडे द्या त्यावर आम्ही निर्णय घेऊ आणि योग्य ठिकाणी पोचू असं शरद पवार यांनी त्यांना सांगितलं..
यावरून आता दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना थेट सवाल केला आहे.. तुम्हाला विजय मिळतो जास्त जागा मिळतात.. तेव्हा ईव्हीएम चांगला असतो आणि पराभव होतो तेव्हा खराब होतो असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.. सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत त्यांच्या बाजूने निकाल लागला तर यंत्रणा चांगली अन निकाल विरोधात गेला तर कोर्टावर आरोप अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला.