राजमुद्रा : राज्यात महायुतीचे सरकार येण्यात मोलाचा वाटा असलेली “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” सत्ताधाऱ्यांना लकी ठरली. निवडणुकीआधी या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दर महिन्याला देण्यात आले.मात्र महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जाईल असा आश्वासन लाडक्या भावानीं केलं.. या निकालानंतर आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे..योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.. निवडणुकीत बहिणींचे मत विकत घेण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांच्याकडून झालाय.. याआधी निकष न बदलता त्यांना पैसे दिलेत.. मात्र आता ही योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.. आता आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना पैसे दिले त्यांना नोटीसी पाठवून पैसे काढून घेऊ नका असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे..
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या आता असं लक्षात आलं आहे की,या योजनेचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतोय, त्यामुळे ती योजना बंद करायला हवी. आता त्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, असा धक्कादायक खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. अमोल लाडक्या बहिणींची चिंता वाढली असल्याच म्हटलं जात आहे. या निवडणुकीत मत मिळावी यासाठी कोणतीही शहानिशा न करता लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये दिलं गेलं आणि आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निकष बदला असे सांगितले आहे.
नव्या मुख्यमंत्र्यांच्या आता असे लक्षात आले की, शहर भागात उत्पन्न चांगले असलेल्या महिलांनाही याचा लाभ अधिक झाला आहे.. मात्र योजनाही ही गरीब महिलांसाठी, सामान्य महिलांसाठी योजना आहे. ज्यांचं उत्पन्नाचे साधन नाही, अशा ग्रामीण भागातील, शहरातील महिलांसाठी ही योजना असावी अशी आमची भूमिका होती. पण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्यामुळे काही लाख महिला आता त्यांच्यासमोर आल्या आहेत”, असेही संजय राऊतांनी म्हटले. त्यामुळे आता ही योजना बंद करण्याचा हालचाली सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.