राजमुद्रा : महायुती सरकारच्या नव्या शपथविधीनंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन आज पार पडलं.या विधानभवनात कर्नाटकातील काँग्रेस सरकारने धक्कादायक निर्णय घेतला आहे..या निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.कर्नाटकमधील सिद्धरमैया यांच्या नेतृत्वातील सरकारनं कर्नाटकच्या विधानसभेत असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.. आता यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
कर्नाटकसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं कोणतेही योगदान नसल्याचं कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असल्याचा त्यांनी म्हटले आहे. याआधी बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वातील सरकारनं विधानसभेत सावरकरांचा हा फोटो लावला होता. पण आता काँग्रेस सरकारने घेतलेल्या या निर्णयाने नवीन वादाला तोंड फुटला असून यावरून आता सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.रणजित सावरकर यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, या निर्णयाची काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागेल..काँग्रेसकडून या पेक्षा काही वेगळी अपेक्षा नव्हती. काँग्रेस फक्त टिपू सुल्तान यांचं कौतुक करते असं रणजित सावरकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे काँग्रेसच्या या निर्णयावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलं आहे की त्यांचा हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे. दरम्यान यावरून बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल चढवला आहे.. काँग्रेस सोबत आघाडी करताना ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना मूठमाती दिली..त्यामुळे आता त्यांना टिपू सेना म्हणण्याची वेळ आली आहे.. सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग घेऊन गप्प बसणार असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे..
कर्नाटक सरकार आतील काँग्रेसने घेतलेले या निर्णयाने आता त्यांच्यावर भाजपने आक्रमक होत जोरदार टीका केली आहे.. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.