राजमुद्रा : पुण्यात सोमवारी खळबळजनक घटना समोर आली आहे.भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ याचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.. आता या हतेप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.. पुणे क्राईम ब्रँच पथकाने या हत्याप्रकरणी दहा ते पंधरा जणांची चौकशी केली.. या चौकशीनंतर आता पवन शर्मा आणि नवनाथ गुळसाळी या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे.. यामध्ये शर्मा हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.. मात्र सतीश वाघ यांच्या अपहरण आणि खून प्रकरणात पाच आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.. आतापर्यंत चौघांना ताब्यात घेतला असून अन्य एकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी ६.३० वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपींनी त्यांना मांजरी येथून कारमध्ये बसवून त्यांना यवत परिसरात नेले. या ठिकाणी त्यांचा आरोपींनी लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून कानरयात आला, तसेच त्यांचा मृतदेह हा त्याच ठिकाणी फेकून देण्यात आला. यवत गावच्या हद्दीत त्यांचा मृतदेह दिसल्यावर त्यांच्या मृतदेहाशेजारी लाकडी दांडका पोलिसांना सापडला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यु नक्की कशाने झाला आहे हे समजेल अशी माहिती, पोलीस उपायुक्त ए राजा यांनी दिली आहे.या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.. यानंतर आतापर्यंत या प्रकरणात चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.. पुढील आरोपीचा तपास सुरू आहे.
सतीश वाघ यांचं अपहरण केल्यानंतर काही तासातच त्यांची हत्या केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.. त्यामुळे घटना ठिकाणी डॉग्स कोड आणि फॉरेन्सिक टीमला पुरावे सापडले आहेत.. त्यात रक्त लागलेले लाकडी दांडके सापडले आहे.. या पुरावेच्या आधारे पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतला आहे.. पुणे पोलिसांनी ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आरोपीचा शोध घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे.