राजमुद्रा : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आला आहे.. त्यांच्या या पक्षप्रवेशावर आता माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिले आहे..गुलाबराव देवकर हे कोणत्याही पक्षात गेले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यांचा सगळा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहे..
असा थेट धमकीवजा इशाराच त्यांनी दिला आहे..
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातून गुलाबराव पाटील राष्ट्रवादीच्या शरद पवार कटाकडून गुलाबराव देवकर रिंगणात होते. या निवडणुकीत गुलाबराव पाटील यांनी देवकर यांचा पराभव करत बाजी मारली.. आता या पराभवानंतर ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाण्यासाठी फिलडिंग लावत आहेत.या प्रवेशावर बोलताना शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, गुलाबराव देवकर यांना पक्ष बदलाची काय घाई झाली आहे. लगेच आठ दिवसांमध्ये या माणसाला पळावे लागत आहे. कारण त्यांनी जिल्हा बँकेत घोटाळा केला आहे. मजूर फेडरेशनचा दहा कोटींचा विषय आहे. अशा कितीतरी गोष्टींचा हिशोब त्यांना द्यायला लागणार आहे.. स्वतःच्या बचावासाठी ते पळ काढत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेचे बडे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे राजकीय शत्रूत्व चर्चेत असते. दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमधून समोरासमोर लढले होते. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील विजयी झाले..
दरम्यान या जळगाव ग्रामीण मतदार संघातून गुलाबराव पाटील पाच वेळा निवडून आले. ते महायुती सरकारमध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री होते. आता पुन्हा त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.