राजमुद्रा : भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी “मिशन लोटस “राबवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल चढवला आहे.. भाजपकडून पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे.. त्यांना देशात विरोधी पक्षच नको आहे..त्यामुळेच हे सर्व सुरु असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाले असा हल्लाबोल त्यांनी चढवला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला.. हा पराभव आघाडीच्या नेत्यांच्या चांगला जिव्हारी लागला.. यावरून बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भाजपकडून लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे काम सुरू आहे..भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे. लोकांशी मतं विकत घेतली जात आहे.. असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
निवडणुकीत झालेल्या परभवानंतर ईव्हीएम वर संशय व्यक्त केला जात आहे… यावर आता आघाडी मैदानात उतरली असून रात्रीच्या अंधारात ७६ लाख मते कशी वाढली ते निवडणूक आयोगाने अद्याप सांगितले नाही. रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा खून केला असून निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तर दिले नाही तर सर्वोच्च न्यायालयातही जाऊ असे नाना पटोले म्हणाले आहेत..
महाराष्ट्रात लोकसभेत भाजपला यश मिळालं नव्हतं त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मिशन लोटस राबवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.. दरम्यान या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला.. यानंतर आता आघाडीमध्ये फूट पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे..