राजमुद्रा : महायुतीच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आला असताना दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या दिल्ली निवासस्थानी भेट घेतली आहे.. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी फुटी नंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी शरद पवार समोरासमोर आले आहेत.दरम्यान . अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजितदादांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचणं ही खास बाब आहे. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राजकीय मैदानात एकमेकांवर टीकेची तोंफ टाकणारे काका पुतणे यांचे कौटुंबिक संबंध अजूनही प्रेमळ आणि जिव्हाळ्याच असल्याचे दिसून येत आहे..
आज शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या राजकारणात वैचारिक विरोधाला कधी व्यक्तीगत विरोधामध्ये बदलू दिलं नाही. त्यामुळे शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. सर्वच पक्षात त्यांचे मित्र आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांना अनेक जण त्यांना शुभेच्छा देत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 उमेदवार निवडून आणले. शरद पवार यांना फक्त 10 आमदारांवर समाधान मानावं लागलं. शरद पवार यांच्या आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय करिअरमध्ये हा त्यांच्यासाठी एक धक्का आहे.
राष्ट्रवादीत बंड करून अजित दादांनी भाजपशी हात मिळवणी केली.. त्यानंतर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर काका पुतण्यामध्ये टोकाचे राजकीय मतभेद झाले… व्यक्तीगत पातळीवर आरोप-प्रत्यारोप झाले. शरद पवार आणि अजित पवार हे नात्याने काका-पुतण्या आहेत. कौटुंबिक संबंध बिघडले. आज शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांनी थेट काकांच निवासस्थान गाठून त्यांना शुभेच्छा देणं ही एक चांगली सुरुवात आहे.