राजमुद्रा : महायुती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून शपथविधीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाला अंतिम रूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिल्लीत दाखल झाले.. सहा आमदारांमागे एक मंत्री अशा फॉर्म्युलावर सहमती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे वरिष्ठ नेत्यांची चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले नाहीत त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधान आलं.. या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही नेत्यांच्या मध्ये अजूनही एक मत नसल्याचं बोलले जात आहे. दरम्यान गृहमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांची नाराजी दूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ते दिल्लीला गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला जवळपास निश्चित झाला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती दिली. बहुतेक 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती त्यांनी दिली. या दिवशी 30 ते 35 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.