राजमुद्रा : महायुती सरकारच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच वरचढ राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.. यामध्ये भाजपकडे सर्वाधिक 20 खाती राहण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना 10-10 खाती मिळणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेने गृह खात्यावर अडून बसल्याची चर्चा असताना आता महायुतीत कळीचा मुद्दा ठरलेला ग्रह खात भाजपकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाला आहे..
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मिळालेल्या माहितीनुसार भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे येणारी खाती पुढील प्रमाणे.
भाजप : गृह विभाग, नगर विकास, कायदा, सामान्य प्रशासन, ग्रामीण विकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, वन, आदिवासी.
शिवसेना : सार्वजनिक बांधकाम (PWD), कामगार, शालेय शिक्षण, राज्य उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, वाहतूक.
राष्ट्रवादी : वित्त व नियोजन, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालकल्याण, मदत व पुनर्वसन, अन्न व औषध प्रशासन.
या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.. येत्या चौदा डिसेंबरला दुपारी बारा वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. यामध्ये 35 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे..