राजमुद्रा : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार असल्याची माहिती समोर आली आहे.. दुपारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार असून यावेळी 15 ते 20 मंत्री शपथ घेणार आहेत.यामध्ये भाजपचे 8 ते 10 शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे प्रत्येक चार ते पाच मंत्री असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे..मात्र या शपथविधीआधी आमदारांची धाकधूक वाढली असून उद्या कोणत्या आमदारांना संधी मिळणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधी मध्ये भाजपच वरचढ ठरला आहे.. उद्याच्या शपथ विधीमध्ये भाजपकडून सर्वाधिक दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.. यामध्ये गिरीश महाजन,सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, माधुरी मिसाळ,पंकजा मुंडे, अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले,रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार यांच्या नावाचा समावेश आहे..
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे पाच ते सहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.. यामध्ये दादा भुसे,शंभूराज देसाई,उदय सामंत,दीपक केसरकर तसेच गुलाबराव पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता आहे..तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून मंत्री पदासाठी धनंजय मुंडे अदिती तटकरे छगन भुजबळ संजय बनसोडे नरहरी शिरवळ यांचा समावेश असल्याची शक्यता आहे.. दरम्यान पुढच्या टप्प्यात अनिल पाटील,दत्ता भरणे, मकरंद पाटील आणि इंद्रनील नाईक यांच्या गळ्यात मंत्रिमंडळाची माळ पडण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळणार असल्याची माहिती समोर आले आहे..त्यामुळे उद्या होणाऱ्या भव्य अशा शपथविधी सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत..