राजमुद्रा : राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली..या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात आले.या योजनेचे अंमलबजावणी करत जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा ही करण्यात आले.. आता या लाडक्या बहिणींचे सहाव्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे.. या बहिणींची प्रतीक्षा संपली असून येत्या दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा होणार असल्याच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुतोवाच दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजने संदर्भात निकष बदलले जाणार,,,महिला अपात्र ठरणार यासारख्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.. संदर्भात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली.. त्यानंतर आता पुढील दोन दिवसात पंधराशे रुपये खात्यात जमा होतील असं सांगण्यात आला आहे..त्यामुळे आता सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत..
या चर्चावर बोलताना भाजपाने ते सुधीर मुनगंटीवार यांनी असेही म्हटले आहे की,, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कुठेही बंद पडणार नाही.. ही कायमस्वरूपी राहणारी योजना आहे.. मात्र या योजना विरोधात चुकीच्या पद्धतीने प्रचार करत काँग्रेस पक्ष आहे.. त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करा असंही त्यांनी म्हटल आहे..
दरम्यान याआधी जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.. या योजनेचा या निवडणुकीत चांगलाच फायदा झाला.. आणि महायुतीने मुसंडी मारली.. आणि महाविकास आघाडीचा धुवा उडाला.. आता या योजनेचा इम्पॅक्ट बघून दिल्लीतही लाडकी बहीण सुरू होणार आहे