राजमुद्रा :राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा यांच्यामध्ये टोकाचे राजकीय मतभेद झाले. व्यक्तीगत पातळीवर आरोप-प्रत्यारोप झाले. अशातच काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या..यावरून आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे..अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही गटाने अर्थात राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे, मूठ घट्ट राहिली पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केल आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा काल ८५ वा वाढदिवस साजरा झाला असून त्यांच्या आयुष्याचा हा मोठा टप्पा आहे. त्यांना अनेकांनी भेटून शुभेच्छा दिल्या.. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा झाली..तसेच विरोधकांनी टीकाही केल्या..या विरोधकांच्या टीकेवर बोलताना त्या म्हणाल्या, दादा कोणालाही भेटले, कुठेही गेले, काहीही बोलले तरी त्याची बातमी होते. असं म्हणत असताना कुटुंबात मतभेद हे असतातच. असं त्यांनी सांगितलं.
आपापसातले मतभेद मिटून अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येऊ शकतात. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे. सत्तेसोबत जायचं का याबाबत शरद पवार निर्णय घेणार आहेत, असं सुनंदा पवार म्हणाल्या आहेत. तर मूठ घट्ट राहिली ताकद वाढते. पण जर विखुरलेले राहिले तर त्याची ताकद कमी होते. त्यामुळे एकत्र राहणं हे कधीही चांगलं असल्याचं मत सुनंदा पवार यांनी व्यक्त केलं.शरद पवार आणि अजित पवार यांची झालेली भेट ही राजकीय नसून कौटुंबिक होती.. असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 उमेदवार निवडून आणले. शरद पवार यांना फक्त 10 आमदारांवर समाधान मानावं लागलं. शरद पवार यांच्या आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय करिअरमध्ये हा त्यांच्यासाठी एक धक्का आहे.