राजमुद्रा : महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना आज नागपूर मध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे..या महायुतीच्या नव्या सरकारमध्ये भाजपला 20, शिवसेनेला 12, आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीला 10 खाती मिळणार आहेत.. दरम्यान आजच्या शपथविधीसाठी वरिष्ठ नेत्यांकडून प्रत्येक पक्षातील आमदारांना शपथविधीसाठी फोन करण्यात आले आहेत..भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः आमदारांना फोन करुन मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगत आहे.
दरम्यान आज सकाळपासून संबंधित पक्षांच्या वरिष्ठांकडून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केले गेले आहेत आणि मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगितले
भाजपकडून कोणा कोणाला मंत्रिपद?
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे,
अतुल सावे,
माधुरी मिसाळ,
चंद्रशेखर बावनकुळे,
अशोक उईके,
आकाश फुंडकर
शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपद?
उदय सांमत
प्रताप सरनाईक
शंभूराज देसाई
योगश कदम
आशिष जैस्वाल
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
दादा भूसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट
राष्ट्रवादीकडून कोणाकोणाला मंत्रीपद?
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तमामा भरणे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली. भाजपच मोठा पक्ष महायुती ठरला..भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह 20 मंत्रिपदे आली आहेत. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 12 मंत्रिपदे मिळणार आहे. शिवसेनेचे 11 मंत्री आज शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 खाती मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री आज शपथ घेणार आहे. त्यामुळे या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत