राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपने मुसंडी मारली.. त्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.. आज नागपूर मध्ये त्यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचा शपथविधी पार पडणार आहे.. आज सकाळपासून भाजपकडून आमदारांना मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी फोन केले आहेत.. यामध्ये निलेश राणे,शिवेंद्रराजे भोसले,माधुरी मिसाळ, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे..मात्र भाजपकडून सुरेश खाडे आणि विजयकुमार गावत यांना डच्चू देण्यात आला आहे..
भाजपकडून “या” नेत्यांना मंत्रिपद?
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे,
अतुल सावे,
माधुरी मिसाळ,
चंद्रशेखर बावनकुळे,
अशोक उईके,
आकाश फुंडकर
दरम्यान या महायुती सरकारमध्ये रवींद्र चव्हाण यांना दुसरी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे तसेच जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदावर अद्याप कोणती माहिती समोर आली नाही..
भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्रीपदे आली आहेत.. तर शिवसेनेच्या वाट्याला एकनाथ शिंदे यांच्यांसह १२ मंत्रीपदे तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 10 खाती मिळणार आहेत.