राजमुद्रा : महायुती सरकारच्या राज्यमंत्री मंडळ विस्तारासाठी काही अवधी शिल्लक असताना भाजपकडून पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरण्यात येणार आहे. माजी कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांना मंत्रिपदाऐवजी पक्षात एक मोठी संधी दिली जाणार आहे. त्यांना भाजपकडून प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली जाणार आहे.यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांचं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे..
महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना आज नागपूर मध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे..या महायुतीच्या नव्या सरकारमध्ये भाजपला 20, शिवसेनेला 12, आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीला 10 खाती मिळणार आहेत.. आज सकाळपासून वरिष्ठ नेत्यांच्याकडून पक्षातील आमदारांना शपथविधीसाठी फोन केले आहेत..अशातच माजी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजप मोठी जबाबदारी टाकणार आहे..मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर बावकुळे हे देखील आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षपद रिक्त होईल. त्यात रविंद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी आहेत.यानुसार आता चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार आहे..
गेल्या तीन निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.. यात विशेष म्हणजे ठाणे आणि कोकणात महाविकास आघाडीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची नवीन जबाबादारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.