राजमुद्रा : महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथील राजभवनात पार पडला.. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली.. यामध्ये जळगावातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी चौथ्यांदा मंत्री पदाची शपथ घेतल्याने त्यांच्या पाळधी या गावी कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्याता आला आहे.
जामनेर मतदारसंघात विजयी झालेले भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हटले जाणारे गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्यांच्या जामनेरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष केला..भाजपाचे नेते गिरीश महाजन हे सातव्यांदा आमदार झाले असून त्यांनी चौथ्यांदा मंत्री पदाची शपथ घेतली आहे.
रावेर यावल मतदार संघात भाजपाचे जयकुमार रावल यांनी मंत्रीमंडळात निवड होऊन त्यांचा शपथविधी झाल्याने त्यांच्या मामाच्या गावात जल्लोष करण्यात आला.. याचबरोबर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाकडून विधानसभा उपाध्यक्ष राहिलेल्या नरहरी झिरवाळ यांना ही संधी देण्यात आली..तसेच मालेगाव मतदार संघात विजय झालेले एकनाथ शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.
उत्तर महाराष्ट्रात यांनी घेतली शपथ –
गिरीश महाजन – भाजप
जयकुमार रावल -भाजप
दादा भुसे – शिवसेना
गुलाबराव पाटील -शिवसेना
नरहरी झिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस