राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपा 19 ,शिवसेना 11, राष्ट्रवादी 9 अशा एकूण 39 आमदारांनी शपथ घेतली.मात्र या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती मधील तिन्ही पक्षात नाराजी नाट्य सुरु झाले आहे.. अशातच आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.. त्यानंतर आता त्यांना राज्यमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना त्यांना पक्षाने राज्यसभेच्या ऑफर देऊ केले आहेत.. मात्र राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक नसल्याचे त्यांनी सांगत राष्ट्रवादीची ऑफर त्यांनी नाकारली.आता छगन भुजबळ पुढे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिले नसल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.. या आधीचा 2014 ते 2019 हा काळ सोडता छगन भुजबळ अनेक वर्ष मंत्री राहिले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देखील काम केले आहे. परंतु आता त्यांना संधी दिली गेली नाही.
नाशिक जिल्ह्यात 7 राष्ट्रवादी आमदारांपैकी फक्त नरहरी झिरवळ यांना मंत्रीपद मिळाले आहे. भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज झाल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीत अडीच-अडीच वर्ष मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांनी त्यासंदर्भात रविवारी वक्तव्य केले होते.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना तुम्ही विधानसभेचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जाणार का? असा पुन्हा एकदा सवाल केला असता भुजबळ यांनी राष्ट्रवादीची ऑफर स्वीकारत नसल्याचं स्पष्ट केल आहे. त्यामुळे आता ते पुढे काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..