राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीत नाराजी नाट्य सुरू झाला असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. असंच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील 24 तासापासून कोणालाही भेटले नाहीत.. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आला आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीने धक्का तंत्र वापरलं असल्या कारणाने तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये आता नाराजीचा विस्तारही होऊ लागला आहे. राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आणि उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार गेल्या 24 तासापासून नॉट रिचेबल असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत..
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नागपुरातील असणाऱ्या निवासस्थानी कार्यकर्ते भेटीसाठी जात आहेत.. मात्र ते नसल्याचे सांगितले जात आहे.. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे.. तर दुसरीकडे अजितदादा नोट रीचेबल असल्याने चर्चांना उधाण आला आहे..हिवाळी अधिवेशन सुरू झाल असून सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात उपस्थित राहिले नाहीत.. विधिमंडळाच्या अधिवेशनाबाबत ते कायम गंभीर असतात.. त्यांच्याकडे मागण्यांचे नियोजन घेऊन येणाऱ्यांची संख्या चांगलीच असते मात्र ते 24 तासापासून गायब असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभागृहातल्या कामकाजात हे आवर्जून असतात. आता, महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत.