राजमुद्रा : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपा -राष्ट्रवादी- शिवसेना यांच्यामध्ये नाराजीचा सूर पसरला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना डावलले असल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली.. यावरून आता शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांनी (Uddhav Thackeray) छगन भुजबळ आमच्या अधून मधून संपर्कात असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे..
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आलं आहे. मात्र, ज्येष्ठ व वरिष्ठ नेते राहिलेल्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून 4 माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला असून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) व माजी गृहमंत्री राहिलेल्या दिलीप वळसे पाटील यांनाही डावलण्यात आलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादीत नाराजीचा सूर पसरला आहे..
या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी न मिळालेल्याच्यांबद्दल मला अधिक वाईट वाटत आहे.भुजबळांच्या बाबतीत मला वाईट वाटलं, कारण मंत्रीपद मिळेल या आशेनेच तिकडे सर्वजण गेले होते. तरी बरं घट्ट झालेलं जॅकीट आता तरी घालायला मिळालं. काही जणांची जॅकेट आणखी वाट पाहात असतील, त्यांच्याबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो, असे म्हणज छगन भुजबळांसह मंत्रिपद नाकारलेल्या आमदारांच्या नाराजीवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं
नुकताच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाला असून या अधिवेशनाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.. ते म्हणाले की, विधिमंडळ अधिवेशनाची प्रथा असते, मुख्यमंत्री मंत्र्यांची ओळख करून देतात, पण अनेक आरोप असेलेल्यांचा परिचय मुख्यमंत्री यांना करून द्यावा लागला, हे पहिल्यांदा घडत असेल, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.