राजमुद्रा : महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली आहे.. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा उधाण आला असताना हे भेट शेतीविषयक संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे..
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा गेल्या 12 डिसेंबरला वाढदिवस साजरा झाला.. यावेळी राजकीय मैदानाच्या आखाड्यात आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करणारे अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली.. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे हे दोन्ही एकत्र आल्याच्या चर्चा रंगू लागल्या.. दरम्यान या भेटीनंतर आता दिल्लीत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. या भेटीत सातारा आणि फलटणचे दोन डाळिंब उत्पादक शेतकरी त्यांच्यासोबत होते. या भेटी दरम्यान शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नावर त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत 98 वे मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली होती.. यशस्वी नंतर त्यांनी दिल्लीत जाऊन आज पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची भेट घेतली.. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात तर तर्कवितर्क लावले जात असताना आमच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. पवारांनी त्यांना भेट म्हणून डाळिंब दिली. या भेटीतून कुठलाही राजकीय अर्थ निघू नये, म्हणून ही भेट फक्त पाच मिनिटांचीच होती, असं शरद पवार म्हणाले.